संजयने का केलं बॅकआऊट?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ‘वेलकम टू जंगल’ (Welcome to jungle) म्हणजेच वेलकम चित्रपटाच्या तिसर्या भागाची चर्चा आहे. अक्षय कुमार (Askhay Kumar), दिशा पटानी, रवीना टंडन, श्रेयस तळपदे असे अनेक तगडे कलाकार या निमित्ताने सिनेमात एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहेत. त्यातच सिनेमाच्या स्टारकास्टमध्ये संजय दत्त (Sanjay Dutt) असल्याचे कळल्याने चाहते खूश झाले होते. मात्र, संजयबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. केवळ एक दिवस या सिनेमाचं शूटिंग केल्यानंतर त्याने या सिनेमातून बॅकआऊट केलं आहे. याचं कारणही आता समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे संजय दत्तने हा निर्णय घेतला आहे. संजय दत्तने मुंबईतील मड आयलंडमध्ये फक्त एक दिवस शूटिंग केलं आणि या चित्रपटाला रामराम ठोकला. ‘वेलकम टू द जंगल’ हा लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. संजयच्या व्यक्तिरेखेची चित्रपटात खूप ॲक्शन होती आणि म्हणूनच त्याने त्याच्या प्रकृतीचा विचार करत चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला.
२०२३ मध्ये या चित्रपटाची संपूर्ण कलाकारांसह घोषणा करण्यात आली. अक्षय सोबत या चित्रपटात दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी, सुनील शेट्टी, रवीना टंडन, परेश रावल, लारा दत्ता, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, किकू शारदा, दलेर मेहंदी आणि मिका सिंग यांचा समावेश आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अहमद खान करत आहेत.