Wednesday, July 17, 2024
Homeनिवडणूक २०२४निवडणुकीच्या निकालानंतर रडू बाई रडू आणि कोपऱ्यात बसू अशी संजय राऊत आणि...

निवडणुकीच्या निकालानंतर रडू बाई रडू आणि कोपऱ्यात बसू अशी संजय राऊत आणि उबाठाची अवस्था होणार; त्याची रंगीत तालीम सुरू

शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांचा संजय राऊत व उबाठा वर हल्लाबोल

मुंबई : निवडणुकीच्या निकालानंतर कोपऱ्यात रडत बसण्याची पाळी विरोधकांवर येणार आहे. रडू बाई रडू आणि कोपऱ्यात बसू अशी त्यांची अवस्था होणार आहे. याची विरोधकांना सुद्धा खात्री आहे. म्हणूनच त्याची रंगीत संजय राऊत (Sanjay Raut) आणि उबाठाने (Uddhav Thackeray) सुरू केली आहे. रोज रडक्या पोपटासारखे रडगाणे गात आहेत, अशा शब्दांत शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी संजय राऊत आणि उबाठा यांच्यावर हल्लाबोल केला. मुंबईतील।बाळासाहेब भवन येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विरोधकांचे बालीश विधान

राजू वाघमारे पुढे म्हणाले की, मतदानाची सर्व काळजी निवडणूक आयोग घेत असतो. निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे. हजारो निवडणूककेंद्राच्या हजारो मशिन्स एकाच वेळी काम करत असतात. त्या वेळेस काही वेळा त्या बंद सुद्धा पडू शकतात. शेवटी यंत्र आहे ते. पण निवडणूक आयोगाला सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएम मशिन्स बंद पाडण्यास सांगणे हे बालीश विधान विरोधक करताहेत, हे संजय राऊत आणि उबाठा करताहेत हे अतिशय हास्यास्पद आहे.

संजय राऊत एक भोंदू ज्योतिषी

संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवर बोलताना राजू वाघमारे म्हणाले की, संजय राऊत ज्योतिषी झालेत हे मला माहित नव्हते. कारण उबाठाला जिथे मतदान होणार होते तिथे मशिन्स बंद केल्या असे आरोप आमच्यावर करत आहेत. पण कुठल्या विभागात कुणाला किती मते मिळतात हे कुणीच सांगू शकत नाही, असे असते तर निवडणुका झाल्याच नसत्या. म्हणून संजय राऊत यांची विधाने चुकीची आहेत ते एक भोंदू ज्योतिषी आहेत.

थांबलेल्या नालेसफाई बाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना राजू वाघमारे म्हणाले की, मुंबईतील नालेसफाईचे काम निवडणुकीपूर्वी महापालिकेने घेतले होते. पण आता निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे ते लवकरच पुन्हा सुरू होईल. मुंबईकरांना पावसाळ्यात कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल, असा विश्वास राजू वाघमारे यांनी दर्शवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -