Thursday, April 24, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वSalary Saving : पैशांची उणीव भासतेय? सेव्हिंगचा 'हा' फॉर्म्युला वापरा

Salary Saving : पैशांची उणीव भासतेय? सेव्हिंगचा ‘हा’ फॉर्म्युला वापरा

खर्चानंतरही भासणार नाही पैशांची अडचण!

मुंबई : आजच्या काळात प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या आपल्या भविष्याची चिंता असते. देशातील प्रत्येक नागरिकाची एकच तक्रार असते, ती म्हणजे महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार बँक अकाउंटमध्ये जमा होतो मात्र महिनाअखेर येताच तो संपतो. पगारातील एक रुपयाही वाचत नाही आणि कुठे खर्च झाला तेदेखील समजत नाही. सतत वाढणाऱ्या महागाईमुळे अनेकांसमोर काय खावं आणि काय वाचवावं असा मोठा प्रश्न उभा राहतो. मात्र आता नागरिकांना या गोष्टीची चिंता करावी लागणार नाही. कारण सेव्हिंगचा ‘हा’ फॉर्म्युला वापरल्यानंतर खर्चानंतरही पैशांची अडचण भासणार नाही. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.

सेव्हिंगचा ‘५०:३०:२०’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फॉर्म्युल्याचा अवलंब करुन तुम्ही आता सहज बचत करू शकणार आहात. तसेच हा फॉर्म्युला लागू करून खर्च केल्यानंतरही बचतीसाठी पैसे वाचवू शकाल.

५०:३०:२० बचतीचे सूत्र

फॉर्म्युलानुसार तुमची कमाई तीन भागात विभागण्याची गरज आहे. अन्न, निवारा, आणि शिक्षण यांसह अत्यावश्यक गरजांवर कमाईतील पहिले ५०% खर्च केले पाहिजे. म्हणजे तुम्ही भाड्याने राहत असाल तर तुमचे मासिक भाडे किंवा गृहकर्ज सुरू असेल, तर तुमचा EMI खर्च या ५० टक्के मध्ये जोडला जाऊ शकतो.

३० टक्के पगार कुठे खर्च करावा 

उत्पन्नाच्या ३० टक्के रक्कम तुमची आवड आणि इच्छांशी संबंधित गोष्टींवर खर्च करा. ज्यामध्ये बाहेर जाऊन खाणे, चित्रपट पाहणे, गॅजेट्स, कपडे, कार, बाईक आणि वैद्यकीय खर्चांसाठी कमाईतील ३० टक्के रक्कम बाजूला ठेवा. त्यानंतर उर्वरित २० टक्के बचत केली पाहिजे आणि नंतर ती योग्य ठिकाणी गुंतवली पाहिजे जेणेकरून तिचा चांगला परतावा मिळू शकेल.

अखेरीस बचत करणेही आवश्यक

५०:३०:२० फॉर्म्युलानुसार उर्वरित २०टक्के आधी जतन केले पाहिजे आणि नंतर योग्य ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे. म्हणजेच ५०,००० रुपये पगार असलेल्या व्यक्तीने कमाईतील १० हजार रुपये गुंतवले पाहिजेत ज्यासाठी म्युच्युअल फंडात दर महिन्याला एसआयपी आणि बाँडमध्ये गुंतवणूक करण्याचे पर्याय आहेत. या फॉर्म्युल्यानुसार ५० हजार रुपये कमावणारी व्यक्ती वार्षिक किमान १.२० लाखांची बचत करु शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -