Tuesday, May 21, 2024
HomeदेशAccident: ५० फूट खोल दरीत कोसळली बस, १२ जणांचा दुर्देवी मृत्यू

Accident: ५० फूट खोल दरीत कोसळली बस, १२ जणांचा दुर्देवी मृत्यू

दुर्ग(छत्तीसगड): छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात मंगळवारी एक बस खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की कुम्हारी ठाणे क्षेत्रांतर्गत खपरी गावाच्या करीब मुरम या ५० फूट खोल दरीत बस कोसळल्याने झालेल्या अपघातात १२ जण मृत्यूमुखी पावले. तर इतर ३८ लोक जखमी झाले.

केडिया डिस्टिलरीजची बस कर्मचाऱ्यांना घेऊन निघाली होती. बसमध्ये ४५ कर्मचारी होती. ही घटना मंगळवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. बसवरील नियंत्रण सुटल्याने बस खोल दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी रवाना झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. मृतदेह तसेच जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच दरीत कोसळलेली बस काढण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

 

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी या अपघाताप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, दुर्गच्या कुम्हारीजवळ खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भरलेल्या बसला अपघात झाल्याची दुख:द माहिती मिळाली. मी ईश्वराकडे या अपघातात मृत पावलेल्या कुटुंबियांना हे दुख: सहन करण्याची ताकद मिळो अशी प्रार्थना करतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -