Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीगुढीपाडव्या निमित्ताने ऐरोलीत शोभा यात्रेचे आयोजन!

गुढीपाडव्या निमित्ताने ऐरोलीत शोभा यात्रेचे आयोजन!

नवी मुंबई(प्रतिनिधी) – दरवर्षाप्रमाणे यंदाही विविध संस्था एकत्र येऊन, श्री शालिवाहन शके १९४६ राज्याभिषेक शक ३५०, चैत्र पाडवा निमित्ताने ऐरोली येथे हिंदु नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे

चैत्राची सोनेरी पहाट उंच उंच गुढीचा थाट…… आनंदाची उधळण व सुखांची बरसात….. चला करूया नववर्षाची सुरुवात…..सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील चैत्र पाडवा म्हणजेच गुढी पाडवा या नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात येणार आहे. विविध संस्था एकत्र येऊन हा उत्सव गेली ६ वर्ष साजरा करत आहोत. पारंपारिक वेशभूषा, मराठी संस्कृती याचे अनोखे दर्शन असणाऱ्या या शोभा यात्रेचे हे पाचवे वर्ष आहे.

ऐरोली येथील से-१० सिद्धीविनायक मंदिरा पासून ही स्वागत यात्रा सुरू करून ती से-८ येथील तुळजा भवानी मंदिर पर्यन्त समापन होणार आहे. यंदाचे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष असून याच अनुषंघाने या शोभायात्राचे स्वरूप आखत आहोत. ग्रंथर्दिडी, ज्ञान ज्योत, मर्दानी खेळ पथक, ध्वजपथक, लेझीम पथक, विविध पारंपारिक वेशभूषा पथक असे या स्वागत यात्रेचे स्वरूप आहे.

आपण देखील मित्र परिवार व आप्तेष्टांसह या स्वागत यात्रेत सहभागी व्हावे व याची शोभा वाढवावी. समस्त गृहनिर्माण संस्था रहिवाशी, सामाजिक संस्था व इतर मंडळ प्रर्तीनिधी यांना आम्ही आवाहन करत आहोत की आपण देखील या स्वागत यात्रेत सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करूया. महाराष्ट्राचा संस्कृतिक वारसा व त्या संबंधीचा देखवा, पारंपारिक वेशभूषा पथक, संस्कृती पथक असे विविध प्रकारे आपण या स्वागत यात्रेत सहभागी होऊ शकता.

गुढी पाडवा शोभा यात्रा ज्ञान ज्यात मंगळवार, दिनांक ०९.०४.२०२४, वेळ: सकाळी ६:३० वाजता श्री सिद्धिविनायक मंदिर, से-१०, ऐरोली, नवी मुंबई निघणार आहे. ग्रंथ पूजन, ध्वज पूजन, शस्त्र पूजन, वाद्य पूजन, गुढी पूजन करून ७:३० वाजता शोभा यात्रेला सुरुवात होईल. असे पंकज भोसले, अमर गायकवाड व, महेश परब यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -