Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीLoksabha Election 2024: मतांसाठी काहीपण! प्रचारासाठी उमेदवाराने हाती घेतला वस्तरा

Loksabha Election 2024: मतांसाठी काहीपण! प्रचारासाठी उमेदवाराने हाती घेतला वस्तरा

चेन्नई : काहीच दिवसात देशभरात लोकसभा निवडणुकांना (Loksabha Election) सुरुवात होईल. निवडणुकीचे वारे वाहू लागताच नेते बाहेर पडतात. अनेक ठिकाणी प्रचार सुरु होतो. एरवी ज्या नेत्यांना भेटण्यासाठी तुम्हाला फेऱ्या माराव्या लागतात, ते स्वत:हून तुमच्या दारात येतात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका उमेदवाराने प्रचारादरम्यान चक्क हाती वस्तरा घेत थेट मतदाराची दाढी करणं सुरू केला आहे.

तामिळनाडूच्या रामेश्वरमध्ये लोकसभेचा अपक्ष उमेदवार एका सलूनमध्ये न्हावी म्हणून लोकांचे केस कापताना आणि दाढी करताना दिसत आहे. व्हिडिओ मध्ये हा उमेदवार सलूनमध्ये आलेल्या लोकांची दाढी आणि कटिंग करत त्यांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहे. तसेच उमेदवार चक्क हात जोडून त्या व्यक्तीला मतदान करण्याचे आवाहन करत आहे. अपक्ष उमेदवाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओवर हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यावर लोक भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत. काही मनोरंजनात्मक प्रतिक्रिया देत आहेत तर काहीजण अशा उमेदवारांवर टीका करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -