Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीApple Layoffs: ॲपलकडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; २००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार! काय...

Apple Layoffs: ॲपलकडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; २००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार! काय आहे कारण?

मुंबई : आयफोन निर्माता कंपनी ॲपलने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने कार आणि स्मार्टवॉच डिस्प्ले प्रकल्प बंद केले आहेत. हे प्रकल्प बंद केल्यानंतर ॲपलने ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तर २००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची टांगती तलवार आहे.

ब्लूमबर्गच्या मते, ॲपलने कॅलिफोर्नियामधील ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना प्रकल्पांमधील महत्त्वपूर्ण बदलांचा भाग म्हणून कामावरून काढून टाकले आहे. यंदा फेब्रुवारीमध्ये कार आणि स्मार्ट वॉच डिस्प्ले डेव्हलपमेंटवर आधारित दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प बंद केले होते. त्यानंतर कर्मचारी कपातीची भीती निर्माण झाली होती.

कार विभागातील ३७१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथील कारशी संबंधित कार्यालयातून ३७१ कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. अनेक सॅटेलाइट कार्यालयातील इतर अनेक लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. मात्र अद्यापही ॲपलने नोकरी कपातीबद्दल अधिक तपशील उघड केले नाहीत.

प्रकल्प बंद झाल्याने २००० कर्मचारी बाधित

अहवालानुसार, कंपनीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पर्सनल रोबोटिक्स विभागात अनेक लोकांची बदली करण्यात आली आहे. हे प्रकल्प बंद पडल्याने सुमारे २००० कर्मचारी प्रभावित झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -