मुंबई : बॉलिवूड स्टार आणि युवा आयकॉन आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याला अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishta) कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.
या शुभ समारंभात आयुष्मान (Ayushman Khurana) हा सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी, अनिल अंबानी, रतन टाटा, गौतम अदानी, टीएस कल्याण रामन, विराट कोहली, रजनीकांत, मनमोहन सिंग, धनुष, मोहनलाल, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अजय देवगण, प्रभास, यश या भारतीय चित्रपट उद्योगातील आणि उद्योगपतींसह भारतातील सर्वात मोठ्या दिग्गजांसोबत सामील होणार आहे.
मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर संपर्क प्रमुख अजित पेंडसे यांनी ‘राम लल्ला’च्या भव्य अभिषेक सोहळ्यासाठी आयुष्मानला वैयक्तिकरित्या निमंत्रण दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी रोजी ‘प्राण प्रतिष्ठे’च्या निमित्ताने एक लाखाहून अधिक भाविक मंदिरात दर्शनासाठी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमाला केवळ भाविकच नाही तर अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते, उद्योगपती आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती अपेक्षित आहे.