Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीजेवणानंतर प्रत्येकवेळी ग्रीन टी पिता का? जाणून घ्या योग्य की अयोग्य

जेवणानंतर प्रत्येकवेळी ग्रीन टी पिता का? जाणून घ्या योग्य की अयोग्य

मुंबई: ग्रीन टी हे एक असे अमृत आहे जे आपल्या इम्युन सिस्टीमसाठी अमृतापेक्षा कमी नाही. यामुळे केवळ वजनच घटत नाही तर ग्रीन टी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल आणि जुन्या आजारांमध्येही फायदा होतो. अनेकजण ग्रीन टी हेल्दी असल्याने वारंवार सेवन करतात. खासकरून जेवण केल्यानंतर ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? याबाबत जाणून घेऊया…

जेवल्यानंतर ग्रीन टी घेणे योग्य आहे का?

अनेकदा लोकांचा प्रश्न असतो की ग्रीन टी कधी घेतला पाहिजे. अनेकजण जेवल्यानंतर लगेचच ग्रीन टीचे सेवन करतात. आरोग्य तज्ञांच्या मते जर हेवी जेवण कले तर ग्रीन टी घेणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. ग्रीन टीमुळे जेवण पचण्यास मदत होते. यातील अँटी ऑक्सिडंट आणि कॅटेचिन मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करतात. तसेच पाचनशक्ती सुधारतात. दरम्यान, जेवण कमी घेतले असेल तर ग्रीन टीचे सेवन करू नये.

दिवसातून किती वेळा करावे ग्रीन टीचे सेवन

आता दिवसांतून किती वेळा ग्रीन टीचे सेवन केले पाहिजे. ग्रीन टी पिण्याची सगळ्यात योग्य वेळ वर्कआऊटच्या आधी असते. कारण यामुळे तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळते. इतकंच नव्हे तर ग्रीन टी मेटाबॉलिज्म रेट आणि फॅट बर्न करण्यासही मदत करते. दरम्यान, केवळ कोणतेही ड्रिंक वजन कमी करण्यात तुम्हाला मदत करू शकत नाही. यासोबतच बॅलन्स डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईलही तितकीच गरजेची असते. तज्ञांच्या मते तुम्ही दिवसात २ ते ३ कप ग्रीन टीचे सेवन करू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -