मुंबई: मालदीव वादात(Maldives controversy) अनेक अभिनेत्यांनी उडी घेतली आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून इंडियन टूरिझ्मला सपोर्ट करत आहेत. यातच आता बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनेही एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आणि मालदीवच्या जागी लक्षद्वीरपला एका वेकेशन ठिकाणी निवडण्याबाबत सपोर्ट केला. मात्र लक्षद्वीपला सपोर्ट करणाऱ्या पोस्टमध्य रणवीरने असा फोटो लावला की ज्यामुळे तो ट्रोल होत आहे.
रणवीर सिंहने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, या वर्षी या २०२४मध्ये भारताला शोध घ्या आणि आमच्या संस्कृतीचा ओळखा. आमच्या देशात समुद्र किनारे आणि त्याची सुंदरता पाहण्यासारखे खूप काही आहे. चला भारतात चला. चला भारत पाहूया. #Exploreindianislands. आता रणवीरच्या या पोस्टवरून सोशल मीडिया युजर्सनी दावा केला आहे की पोस्टमध्ये अभिनेत्याने जो फोटो वापरला आहे ते मालदीव आहे.
फोटो डिलीट केल्यानंतरही झाला ट्रोल
रणवीर सिंहच्या या पोस्टवर एका युजरने म्हटले, तुम्ही मालदीवचा फोटो टाकून भारतीय आयलँडला प्रमोट करत आहात. तुम्हाला काय झालेय रणवीर? आता युजरच्या या प्रश्नानंतर रणवीर सिंहने तो फोटो डिलीट केला. मात्र तोपर्यंत हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. फोटो हटवल्यानंतर एका व्यक्तीने लिहिले, डिलीट करण्यास खूप उशीर झाला. इंटरनेट नेहमीच जिंकते. एका दुसऱ्या युजरने लिहिले, मालदीवच्या हा फोटो पोस्ट केला आणि हटवला.
You are promoting Indian islands while putting a picture of Maldives.
What is wrong with you, Ranveer? pic.twitter.com/lf0VAWE2GJ
— Suraj Balakrishnan (@SurajBala) January 8, 2024
अनेक स्टार्सनी हॅशटॅग एक्सप्लोर इंडियन आयलँडला केला सपोर्ट
पंतप्रधान मोदीच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या एका मंत्र्याने आक्षेपार्ह विधआन केले होते. यानंतर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी घरगुती टूरिझ्नला सपोर्ट करत आणि मालदीवला बायकॉट करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन, श्रद्धा कपूर, सलमान खान, अक्षय कुमार, कंगना राणावत, जॉन अब्राहमसह अनेक सेलिब्रेटींनी हॅशटॅग एक्सप्लोर इंडियन आयलँडला सपोर्ट केले होते.