मुंबई: आजकाल वाढते वजन हे अनेक समस्यांचे कारण बनत आहे. लोक आपले वजन कमी करण्यासाठी विविध पद्धती वापरतात. मात्र यानंतरही वजन कमी होत नाही. फार कमी लोक जणातात की पाण्यामुळे केवळ तहानच भागत नाही तर वजनही कमी होते. पाणी शरीराला योग्य पद्धतीने काम करण्यास मदत करता. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते तसेच पचनापासून ते मेटाबॉलिज्मवरही परिणाम होतो. जाणून घ्या पाणी कशा पद्धतीने वजन कमी करण्यास मदत करतात.
जास्त भूक लागत नाही
अनेकदा जेव्हा आपण पुरेसे पाणी पीत नाही तेव्हा शरीर याचे संकेत देऊ लागते. यामुळे भूक लागते मात्र खरंतर भूक लागलेली नसते. असे जाणवल्याने लोक अधिक जेवतात. अशातच जेव्हा आपण पुरेसे पाणी पितो तेव्हा अधिक खाल्ले जात नाही. ओव्हरईटिंगपासून आपण वाचतो.
टॉक्सिन्स शरीरातून बाहेर निघतात
पाणी शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करतात. पाण्यामुळे आपले शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफाय होते आणि युरिनमधून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम केले जाते. यामुळे शरीर योग्य पद्धतीने काम करते. यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते.
कॅलरी फ्री
अनेकदा तहान लागली की आपण हाय कॅलरी ड्रिंक्स अथवा सॉफ्ट ड्रिंक पितो यात मोठ्या प्रमाणात शुगर तसेच कॅलरीज असतात. मात्र पाण्यमध्ये शून्य कॅलरीज असतात. पाण्यामुळे तहानही भागली जाते.
मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यास मदत
पाणी पुरेसे प्यायल्याने मेटॉबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत होते. जेव्हा बॉडी योग्य पद्धतीने हायड्रेट होते तेव्हा पोषकतत्वे शरीरात योग्य पद्धतीने शोषली जातात. यामुळे एक्स्ट्रा कॅलरी बर्न होते.