नवी दिल्ली: भारताचे औषध नियामक DCGIने चार वर्षांहून कमी वयाच्या मुलांसाठी सर्दी आणि खोकल्यासाठी कफ सिरपच्या वापरावर बंदी घालताना इशारा दिला आहे. DCGIने १८ डिसेंबरला सर्व राज्यांना एक पत्र लिहित दोन औषधे क्लोरफेनिरामाईन मॅलेट आणि फिनाईलफ्राईनच्या कॉकटेलचा वापर करून बनवलेल्या सिरपच्या पॅकेजिंगवर लेबलिंग यानुसार करण्यास सांगितले आहे.
खरंतर, या दोन औषधांच्या मिश्रणाने तयार केलेले सिरप अथवा गोळ्यांचा वापर सामान्य सर्दीच्या लक्षणांवरील उपचारासाठी केला जातो. या बंदी घातलेल्या सिरपच्या वापरामुळे जगभरातील १४१ मुलांचा मृत्यू झाल्याने ही बाब समर आली आहे. सर्व औषध कंपन्यांना आदेश देण्यात आले आहेत की या दोन औषधांच्या वापराने तयार झालेल्या सिरपचे लेबलिंग तातडीने अपडेट केले जावे.
कोकाटे समितीच्या शिफारशीच्या आधारावर निर्णय
राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, क्लोरफेनिरामाईन मॅलेट आयपी २ एमजी + फिनाईलफ्राईन एचसीआय आयपी ४ एमजी ड्रॉप/ एमएलच्या फिक्स डोजच्या कॉम्बिनेशनला कोकाटे समितीद्वारे तर्कसंगत घोषित करण्यात आला आहे आणि समितीच्या शिफारशीच्या आधारावर या कार्यालयाने १८ महिन्यांच्या नितीगत निर्णयांतर्गत १७ जुलैला पत्र जारी केले आहे.
कंपन्यांना पॅकेजिंगवर इशारा लिहिण्याचे आदेश
पत्रात म्हटले आहे की, समितीने शिफारस केली आहे की एफडीसीचा वापर ४ वर्षांहून कमी वयाच्या मुलांमध्ये केला जाऊ नये आणि त्यानुसार कंपन्यांनी लेबल आणि पॅकेज इन्सर्टवर यासंबंधीचा इशारा देणारा उल्लेख करावा असे म्हटले आहे.