जोहान्सबर्ग: भारतीय क्रिकेट संघासाठी आजचा दिवस खास आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघ आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो वा मरो आहे.
हा तिसरा सामना पार्लमध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४.३०वाजल्यापासून खेळवला जाईल. दरम्यान, दोन्ही संघ या मालिकेत १-१ अशा बरोबरीत आहेत. अशातच भारतीय संघाने हा सामना जिंकला तर ते मालिकेत २-१ असा विजय मिळवतील.
केएल राहुलकडे इतिहास रचण्याची संधी
या एकदिवसीय मालिकेत के एल राहुल नेतृ्त्व करत आहे. याच पद्धतीने आफ्रिकेविरुद्ध जर भारताने विजय मिळवला तर आतापर्यंतच्या इतिहासात एखाद्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेतील दुसरा विजय असेल. आतापर्यंत भारतीय संघाने आफ्रिकेच्या जमिनीवर एकूण ८ द्विपक्षीय मालिका खेळल्या आहेत. यात आतापर्यंत केवळ एकाच मालिकेत भारताला विजय मिळवता आला. आता भारतीय संघ ९वी मालिका खेळत आहे. अशाच केएल राहुलकडे चांगली संधी आहे.
तिसऱ्या वनडेसाठी दोन्ही संभाव्य संघ
भारतीय संघ: केएल राहुल (कप्तान/विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड़, साई सुदर्शन, तिलक वर्मा, संजू सैमसन, रिंकू सिंह, अक्षर पटेल, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान आणि अर्शदीप सिंह.
साउथ अफ्रीकेचा संघ: रीजा हेंड्रिक्स, टोनी डी जोरजी, रस्सी वैन डर डुसेन, एडेन मार्करम (कप्तान), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, वियान मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिजाद विलियमस आणि ब्यूरन हेंड्रिक्स.