Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीMurder : चिकनवरून झाला वाद, लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

Murder : चिकनवरून झाला वाद, लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

जयपूर: राजस्थानच्या(rajasthan) अलवरमधील तिजारा भागात एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील एका तरुणाने आपल्या मोठ्या भावाची हत्या(murder) केली. खरंतर, मोठा भाऊ चिकन घेऊन आला होता. त्यावेळेस त्याने लहान भावाला चिकन बनवण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. छोट्या भावाने चाकूने मोठ्या भावावर हल्ला केला. यावेळेस लहान भावाने चाकूने धारदार वार केले.

मिळालेल्या माहितीनुसार, तिजारा ठाणेंतर्गत शाबाद गावातील निवसी किशोरी लालची तीन मुले होती. तीनही मजुरी करून घर चालवत होते. यातील एकजण चिकन घेऊन घाला. भुड्डनने लहान भाऊ जगदीशला चिकन बनवण्यास सांगितले. यावरून जगदीश नाराज झाला आणि त्याने चिकन बनवण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

दोघांच्या भांडणादरम्यान आई तेथे भांडण सोडवण्यासाठी आली मात्र दोघांनी तिला धक्का दिला. यांच्या घरातील आरडाओरडा ऐकून गावातील लोक जमले आणि दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांमधील वाद वाढत गेला. या दरम्यान, जगदीशने घरात ठेवलेला चाकू घेऊन भड्डनच्या पोटात घुसवला. जगदीशने अनेक वेळा चाकूने हल्ला केला. यानंतर जगदीश त्या ठिकाणाहून पळून गेला.

या दरम्यान कुटुंबियांनी भुड्डनला तातडीने सरकारी रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी अलवर येथे नेण्यास सांगितले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

गावकऱ्यांच्या सूचनेनंतर पोहोचले पोलीस

गावकऱ्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. त्यानंतर मृतदेह हाती घेत पोस्टमार्टेम केले. तीनही भाऊ मजुरी करत होते. यावेळेस चिकन बनवण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. कुटुंबियांनी या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र याचवेळेस जगदीशने आपल्या भावावर चाकूने हल्ला केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -