मुंबई: प्रसिद्ध रॅपर हनी सिंगबाबत(honey singh) मोठी बातमी समोर आली आहे. त्याचा पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे. बऱ्याच महिन्यांपासून प्रसिद्ध सिंगर आपल्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत होते. अखेर दिल्लीच्या फॅमिली कोर्टाने या जोडप्याला दूर होण्यास मंजुरी दिली आहे. कौटुंबिक न्यायालयाने हनी सिंह आणि त्याची पत्नी यांच्यात गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाची केस संपवत दोन्ही पक्षांकडून घटस्फोट मंजूर केला.
अडीच वर्षांपासून सुरू होती केस
हनी सिंह आणि शालिनी तलवार यांच्यात गेल्या अडीच वर्षांपासून घटस्फोटाची केस सुरू होती. अखेर यावर निर्णय आला आहे. शालिनीने हनीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. कोर्टाने मंजुरी देण्याआधी हनी सिंहला शेवटचे विचारण्यात आले की हनी सिंहला आपल्या पत्नीसोबत राहायचे आहे का? यावर हनी सिंहने उत्तर दिले की आता एकत्र राहण्यास कोणताच अर्थ नाही. आता एकत्र राहणे कठीण आहे. हनीच्या या बोलण्यावर शालिनीनेही होकार दिला. कोर्टात दोन्ही पक्षकारांना वेगळे होण्याची संमती देण्यात आली.
सोबतच हनी आणि शालिनी यांनी एकमेकांवर केलेले आरोप मागे घेतले. मात्र या जोडप्यामध्ये कोणत्या अटीवर घटस्फोट मंजूर झाला हे समोर आलेले नाही. घटस्फोटाच्या सुनावणीत हनी सिंहसोबत मेटलॉ ऑफिसचे पार्टनर ईशान मुखर्जी, अधिवक्ता अमृता चटर्जी आणि जसपाल सिंह होते.
घरगुती हिंसाचाराची शिकार शालिनी
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या सुनावणीनंतर हनी सिंहने समजुतीच्या निर्णयांतर्गत आपली पत्नी शालिनीला एक कोटी रूपयांचा डिमांड ड्राफ्ट सोपवला होता. तर शालिनीने हनीवर आरोप लावताना म्हटले होते की ती भीतीच्या छायेखाली जगत होती.