Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीत्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल

त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आलेल्या धमकीप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हाला सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल, असे ते म्हटले आहे.

ते म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असे शिंदेंनी ट्विटमध्ये म्हटले.

कारस्थान हाणून पाडले जाईल…

ते पुढे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करुन धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल, असा सज्जड दम त्यांनी भरला आहे.

संजय राऊत स्वत:लाच धमकी देतात! विखे पाटीलांनी उडवली खिल्ली

सखोल तपासाची मागणी

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवस सुट्टीवर आहेत. ते आपल्या कुटूंबासह काश्मीरमध्ये गेले आहे. तिथून त्यांनी या परिस्थितीचा आढावा घेऊन हे ट्विट केले आहे. शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव सौरभ पिंपळकर असल्याचे समजते. त्याच्या ट्विटरच्या बायोवर भाजप कार्यकर्ता असल्याचा उल्लेख असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटले आहे. तसेच खरंच तो भाजपचा कार्यकर्ता आहे की, नाही याची माहिती नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. या घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -