मुंबई (प्रतिनिधी): मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयातील नेत्रतज्ञ्ज डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह ९ वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक त्यांच्या पदाचे राजनामे दिले आहेत. या राजीनाम्यानंतर खळबळ उडाली आहे.
जे. जे. रुग्णालयातील नऊ डॉक्टरांनी निवासी डॉक्टर आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्या छळाला कंटाळून दिले राजीनामे दिले आहेत. जे. जे. रुग्णालयातील अधिष्ठाता आपल्याला वर्षभरापासून मानसिक त्रास देत असल्याचा या डॉक्टरांचा आरोप आहे. जे. जे. रुग्णालयातील ९ डॉक्टरांचा तडकाफडकी राजीनामे देण्याचा प्रकार धक्कादायक मानला जात आहे. डॉ.तात्याराव लहाने यांच्यासोबत डॉ.शशी कपूर, डॉ.दीपक भट,डॉ.सायली लहाने, डॉ.रागिणी पारेख, डॉ.प्रीतम सामंत, डॉ.स्वरांजित सिंग भट्टी, डॉ.आश्विन बाफना आणि डॉ. हमालिनी मेहता या ९ जणांनी राजीनामे दिले आहेत. जे. जे. रुग्णालयातील जेष्ठ डॉक्टरांनी एक निवेदन जारी करत राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. तसेच या परिपत्रकात राजीनाम्यामागील कारण स्पष्ट केले आहे. जे. जे. रुग्णालयातील ९ डॉक्टरांनी राजीनामा देण्यामागे त्यांना होणाऱ्या मानसिक त्रासाचे कारण नमूद केले आहे. या डॉक्टरांनी निवासी डॉक्टर आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.