Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीसामनगाव रोड पॉलिटेक्नीक येथील अतिक्रमण जमीनदोस्त

सामनगाव रोड पॉलिटेक्नीक येथील अतिक्रमण जमीनदोस्त

अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नाशिक (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून नाशिक रोड विभागात अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. यावेळी तीन मजली आरसीसी अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले व नाशिक रोड सामनगाव रोड पॉलिटेक्नीक कॉलेज येथे सहा ते सात अनधिकृत घरांचे बांधकाम निष्कासित करण्यात आले.

अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त तथा नाशिक रोड विभागीय अधिकारी मदन हरीश्चंद्र, नवीन नाशिक विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील, पूर्वचे राजाराम जाधव, पश्चिम विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्यामार्फत ही अनधिकृत अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.

कारवाईत नाशिक पश्चिम विभागाचे विकी जाधव, प्रवीण बागुल, नवीन नाशिक विभागाचे प्रदीप जाधव, सातपूर विभागाचे तानाजी निगळ व भगवान सुर्यवंशी आदी कर्मचारी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरीक्त पोलीस बंदोबस्त व मनपाचे सुरक्षा रक्षक कारवाईच्या वेळी हजर होते. कारवाई करतेवेळी अनधिकृत अतिक्रमण धारकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. कारवाईसाठी एक पोकलेन,२ जेसीबी, सहाही विभागांचे पथक तसेच नगर रचना विभागाचे उपअभियंता विशाल गरुड व सहा.अभियंता खुळे उपस्थित होते.

याबाबत अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांनी नागरिकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकामे, पत्र्याचे शेड, टपऱ्या अशा प्रकारचे अतिक्रमण काढून घेण्यात यावे. अन्यथा अतिक्रमण पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल आणि कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल. तसेच रस्त्यावरील विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -