भिवंडी: भिवंडीत दोन कामगारांमध्ये झालेल्या वादात बुधवारी रात्री एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. हे दोघे कामगार पश्चिम बंगालचे असून ते मोलमजुरी करण्यासाठी भिवंडीत आले होते. दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे, भिवंडीत मोलमजुरीसाठी पश्चिम बंगाल राज्यातून आलेल्या दोघा कामगारांमध्ये जेवण बनविण्यावरून वाद झाला या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले आणि यात एका कामगाराने त्याच्या सहकऱ्याची दगडाने ठेचून हत्या केली. यातील आरोपीचे पिज्यु बर्मन असून मृत कामगाराचे नाव दिपक बर्मन आहे. या घटनेची माहिती मिळताच निजामपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आरोपी पिज्यु पसार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.