शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
मुंबई: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाद्वारे शेतकऱ्यांना गुडन्यूज दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आता फक्त एक रुपयात पीक विमा मिळणार आहे. विमा हप्त्याची रक्कम अतिशय कमी केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या योजनेत विमा हप्त्याच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जात होती पण, आता शेतकऱ्यांवर कोणताच भार राहणार नाही. राज्य सरकारच शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरणार आहे. यासाठी ३ हजार ३१२ कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
राज्य सरकारने यंदा अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक भरीव घोषणा केली आहे. पीकविम्याप्रमाणेच वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकर्यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी ७५ हजार रुपये वार्षिक भाडेपट्टा, दिवसा वीजपुरवठ्यासाठी ३ वर्षांत ३० टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण यातून ९. ५० लाख शेतकर्यांना लाभ देणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली.