मुंबई: निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्याच्याविरोधात उद्धव ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात (supreme court ) जाणार आहे. यानंतर आता एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. आयोगाच्या निर्णयाला उद्धव गटाने आव्हान दिल्यास न्यायालयाने एकतर्फी सुनावणी घेऊन कोणताही आदेश देऊ नये. त्यांची बाजूही ऐकून घ्यावी, अशी विनंती कॅव्हेटद्वारे न्यायालयाला करण्यात केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी निकाल आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे संकेत दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ‘मातोश्री’बाहेर सभा घेतली. यावेळीही त्यांनी आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.
सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रेसह अन्य आठ महत्त्वाच्या मुद्द्यांवर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे. मंगळवारपासून पुन्हा नियमित सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. त्यापुर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह याबाबत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला.