Friday, October 11, 2024
Homeताज्या घडामोडीशिवसृष्टी आशिया खंडातील सर्वात मोठं आणि ऐतिहासिक थीम पार्क होईल: अमित शाह

शिवसृष्टी आशिया खंडातील सर्वात मोठं आणि ऐतिहासिक थीम पार्क होईल: अमित शाह

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांचं यांच जीवन म्हणजे एक विचार आहे. हा विचार मानणारे अनेक लोक या शिवसृष्टीचं काम पुढे नेतील. या कामात हजारो लोक सामील होतील. ही शिवसृष्टी आशिया खंडातील सर्वात मोठं आणि ऐतिहासिक थीम पार्क होईल, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अमित शहा यांनी ‘शिवसृष्टी’च्या उद्घाटनप्रसंगी केलं.

अमित शाह यांच्या हस्ते आज शिवजयंतीचं औचित्य साधत पुण्यात ‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेमधून ही शिवसृष्टी साकारण्यात आली आहे.

केंद्रिय मंत्री शाह पुढे म्हणाले, आज शिवसृष्टीचं लोकार्पण होत आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं स्वप्न साकार होत आहे. आज शिवजयंतीही आहे. लोकार्पणासाठी शिवजयंतीचा मुहुर्त योग्यच आहे. यापेक्षा वेगळा योग्य मुहुर्त असूच शकत नाही.

 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा संघर्ष हा स्वराज्यासाठी होता. सत्ता लालसेसाठी त्यांचा संघर्ष नव्हता. शिवाजी महाराज हे साहसी राजे होते. ते स्वत: लढाईत पुढे असायचे. लढाईचे नेतृत्व स्वत: करायचे. फारच थोडे राजे आहेत की जे स्वत: फ्रंटवर असायचे. त्यापैकी शिवाजी महाराज एक आहेत. त्यांच्या आयुष्यातील अशा कितीतरी लढाया आहेत. ज्या त्यांनी स्वत: लढल्या आहेत. त्यांच्यासारखा शूरवीर राजा या धरतीवर झाला नाही, असंही शाह म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -