Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रशिवसेना, धनुष्यबाण निर्णयानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची काळाराम मंदिरात महाआरती

शिवसेना, धनुष्यबाण निर्णयानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची काळाराम मंदिरात महाआरती

खासदार हेमंत गोडसे, अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे, राजू लवटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती

नाशिक (प्रतिनिधी): निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिल्या नंतर नाशिक मधील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी काळाराम मंदिरात जाऊन महाआरती केली. नाशिकमधील शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. काळाराम मंदिराचे विश्वस्त महंत सुधीर पुजारी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी काळाराम मंदिरात आरती केली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, राजू लवटे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिक महानगरप्रमुख प्रवीण तिदमे म्हणाले की, प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने आमच्या गटाला नाव आणि चिन्ह मिळाले असून त्याचा आनंद आहे. येणाऱ्या काळात श्री रामाप्रमाणे धनुष्याचा उपयोग लोकांच्या, जनतेच्या हितासाठी केला जाईल असे त्यांनी सांगितले. तर जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले की, प्रभू रामचंद्रांचे जे धनुष्यबाण आहे ते धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला मिळाले आहे. बाळासाहेबांचे जे विचार होते ते विचार सोडून काही लोक काम करत होते. त्यामुळे निवडणूक आयोगाचा जो काही निर्णय झाला तो सर्व शिवसैनिकांना अभिप्रेतच होता. या निर्णयामुळे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते खुश आहेत. तसेच काळाराम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांना अशी विंनती केली की, बाळासाहेब ठाकरेंचे जे हिंदुत्वाचे विचार आहेत ते विचार पुढे घेऊन जाण्यासाठी पक्षाला व कार्यकर्त्यांना आशीर्वाद लाभो असे त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -