पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिल्यानंतर काल रात्री रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दापोली येथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शाखेत घुसून शाखेचा ताबा घेतला. तर आज पुण्यातही शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. मात्र पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी केली असली तरी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये तणाव दिसून येत आहे.
दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक असल्यामुळे पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पांगवताना पोलिसांची कसोटी लागली.
आता शिंदे-ठाकरे गटातील संघर्ष तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेच्या शाखांवरुन आता राडेबाजी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.