Wednesday, July 9, 2025

शिवजयंतीनिमित्त कल्याणचे जलतरणपटू करणार पराक्रम

शिवजयंतीनिमित्त कल्याणचे जलतरणपटू करणार पराक्रम
कल्याण (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणचे १५ जलतरण खेळाडू मुरुड बीचपासून पद्मदुर्ग किल्ले आणि पुन्हा पद्मदुर्ग किल्ले से मुरुड जंजिरा किल्ला असे एकूण ९ किलोमीटरचे अंतर पोहून पार करणार आहेत. हे सर्व विद्यार्थी सॅक्रेड हार्ट स्कूलचे असून विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक आणि पालकही या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक राम म्हात्रे यांनी या मोहिमेबद्दल सांगितले की, महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे जतन आणि संर्वधन झाले पाहिजे व पुढच्या पिढीला महाराजांचा इतिहास पाहता आला पाहिजे. गड-किल्ले यांची माहिती त्यांना झाली पाहिजे हा प्रमुख उद्देश या मोहिमेमागे आहे. या मोहिमेमध्ये आमच्याबरोबर सहभागी झालेले विद्यार्थी व शिक्षक आणि पालकांमध्ये सक्षम म्हात्रे, अधिराज म्हात्रे, रोनित म्हात्रे, अनवित तोडकर, समरुधी शेट्टी, तृष्या शेट्टी, अभिप्रत विचारे, ऋतुराज विचारे, श्रीरंग साळुंखे, सिद्धेश पात्रा, मयांक पात्रा, समर मोहपे, निनाद पाटील तसेच शिक्षक रामचंद्र म्हात्रे, काशिनाथ मोहपे, संदिप तोडकर, निलेश पाटील, देवेंद्र साळुंके हे मोहिम पूर्ण करून शिव जयंती साजरी करणार आहेत.
Comments
Add Comment