मुंबई: स्वरा भास्कर अनेकदा तिच्या राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत असते, पण आता तिच्या आयुष्यात खरोखरच एक ‘राजकीय एन्ट्री’ झाली आहे. स्वरा भास्करने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत आपल्या लग्नगाठ बांधली आहे. तशी माहितीच तिने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन चाहत्यांना दिली आहे. दरम्यान, हे कोर्ट मॅरेज आहे.
स्वराने ६ जानेवारीलाच लग्नाची नोंदणी केली होती. स्वरा भास्करचा पती फहाद अहमद हा समाजवादी पक्षाच्या युवाजन सभेचा प्रदेशाध्यक्ष आहे. स्वराने पोस्ट केलेल्या व्हिडिओत तिने तीची लव्हस्टोरीच सांगितली आहे. अत्यंत भावूक क्षण असलेल्या व्हिडिओत स्वरा आणि तिचे आईवडिलही दिसत आहेत.