मुंबई: महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे शनिवारी १८ फेब्रुवारी रोजी राज्यपालपदाची शपथ घेणार आहेत. त्यांचे उद्या शुक्रवारी १७ तारखेला सायंकाळी ५.४५ वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे.
त्यानंतर शनिवार १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.४० वाजता दरबार हॉल, राजभवन येथे शपथविधी समारंभ होणार असल्याचे राजशिष्टाचार विभागाने सांगितले आहे.