मुंबई : मुंबईतील अविघ्न पार्कला दोन दिवसांपूर्वी आग लागल्याची घटना ताजी असतानाच आज घाटकोपर पूर्वच्या पारख रुग्णालयाच्या (Parakh Hospital) इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत एकाचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाल्याचे समजते.
पहिल्या मजल्यावर रुग्णालय असलेल्या इमारतीमधील तळमजल्यावर असलेल्या हॉटेलच्या मागील बाजूला ही आग लागली. स्थानिकांनी तातडीने धाव घेऊन पारख रुग्णालयातील रूग्णांना ‘राजावाडी रुग्णालयात’ हलवण्यासाठी मदत केली.