Wednesday, April 23, 2025
Homeदेशरब्बी हंगामात गव्हाची विक्रमी लागवड

रब्बी हंगामात गव्हाची विक्रमी लागवड

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून समोर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाची विक्रमी लागवड केल्याचे समोर आले आहे. कृषी मंत्रालयाने देशातील गव्हाच्या लागवडी संदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यातून हे समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गहू लागवडीच्या क्षेत्रात १० टक्क्यांची वाढ झाली आहे. एक ऑक्टोबरनंतर देशात साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. रब्बी हंगामातील प्रमुख नगदी पिकांमध्ये गव्हाचा समावेश होतो.

भारतात गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून अनेक देश आपल्याकडून गव्हाची आयात करतात. यावर्षी केंद्र सरकारने गव्हाचे उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने देशात यंदा मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड केली जात आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानेही गव्हाच्या पेरणीची आकडेवारी जाहीर केली आहे.

या अहवालात १ ऑक्टोबरपासून आतापर्यंत विविध राज्यांतील शेतकऱ्यांनी एकूण साडेचार लाख हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी केल्याचे सांगण्यात आले आहे. रब्बी हंगाम २०२२च्या सुरुवातीपासून सुरू असलेल्या गव्हाच्या पेरणीखालील क्षेत्राने गेल्या वर्षीचा विक्रमही ओलांडला आहे. यंदा सुमारे १० टक्के अधिक गव्हाची पेरणी झाली आहे.

उत्तर भारतात गव्हाखालील क्षेत्र जास्त

उत्तर भारतात गव्हाखालील क्षेत्र जास्त आहे. तसेच पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून चांगले परिणाम समोर येत आहेत. या राज्यांमध्ये शेतकरी हवामानाचे निरीक्षण करूनच गव्हाची पेरणी करत आहेत. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत तुरळक ठिकाणी झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलाव्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.

गव्हाच्या पेरणीसाठी जमिनीतील ओलावा ही चांगली गोष्ट आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. अनेक भागात गहू व इतर रब्बी पिकांची पेरणी वेळेत झाली आहे. भारतात गव्हाची फक्त एकदाच कापणी केली जाते. रब्बी हंगामाच्या मध्यभागी थंड तापमानापूर्वी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये गव्हाची पेरणी केल्यानंतर, मार्च-एप्रिलमध्ये पीक काढणीसाठी तयार होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -