नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने जयपूरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध नाबाद १८३ धावांची खेळी खेळली होती. त्या संस्मरणीय खेळीला सोमवारी १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. ३१ ऑक्टोबर २००५ रोजी धोनीने ही कामगिरी केली होती.
१७ वर्षांपूर्वी ३१ ऑक्टोबर २००५ रोजी जयपूरच्या मैदानावर धोनीने श्रीलंकेविरुद्ध नाबाद १८३ धावांची खेळी खेळली होती. त्यानंतर धोनी त्याच्या हेलिकॉप्टर शॉटसाठी प्रसिद्ध झाला. या खेळीत मारलेल्या षटकारांमुळे धोनीने चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले. १४५ चेंडूंत धोनीने १२६.२०च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याने १५ चौकार आणि १० षटकार मारले. त्या संस्मरणीय खेळीला सोमवारी १७ वर्षे पूर्ण झाली आहेत.
धोनीचे पदार्पण २३ डिसेंबर २००५ रोजी झाले. पण, झारखंडचा हा युवा फलंदाज शून्यावर धावबाद झाला. त्यानंतर, ५ एप्रिल २००५ रोजी विशाखापट्टणममध्ये पाकिस्तानविरुद्ध १४८ धावांच्या खेळीने सर्वांचे लक्ष त्याने वेधून घेतले. त्यानंतर जयपूरमध्ये त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी झाली.