नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजप नेते आशिष शेलार यांची अलिकडेच बीसीसीआय खजिनदार म्हणून नियुक्ती झाली आहे. आता बीसीसीआयने शेलारांवर आणखी एक जबाबदारी सोपवली असून त्यांना जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वृत्तसंस्थेने याबाबत ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
शेलारांसह बीसीसीआयचे सहसचिव देवजित साइकिया यांना बिहार क्रिकेट असोसिएशनचे निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत आशिष शेलार यांचे नाव क्रिकेट जगतात सातत्याने पुढे येताना दिसत आहे. आधी आशिष शेलार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिंगणात उतरणार होते.
शरद पवार आणि आशिष शेलार यांचे पॅनल एकत्रितपणे मैदानात उतरल्याने शेलार हेच एमसीए अध्यक्ष होतील, असे म्हटले जात होते. पण नंतर बीसीसीआय खजिनदार म्हणून शेलाराचे नाव पुढे आले. खजिनदार पदासाठी शेलारांनी अर्ज भरला असल्याचे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगतिले. त्यानंतर शेलार खजिनदार म्हणून नियुक्तही झाले. ज्यानंतर आता त्यांना आणखी एक जबाबदारी बीसीसीआयने दिली आहे.