मुंबई : मुंबईसह राज्यात होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पुरूष व महिला पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
शिंदे यांच्या आदेशानुसार, भांडुप विधानसभा उपविभाग प्रमुख पदी संजय दुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाखाप्रमुखपदी प्रकाश सकपाळ तर भांडुप विधानसभा संघटकपदी नेहा नंदकुमार पाटकर, महिला शाखा संघटक ११५ तेजस्वी गजानन बने, शाखा समन्वयक पदी नियुक्ती ज्योती प्रकाश तांडेल या शिवसेनेच्या ३ महिलांची नेमणूक करण्यात आली आहे.
पक्ष मजबूत करण्यासाठी हे महत्वाचे पाऊल त्यांनी उचलले आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी स्वाक्षरीचे पत्र त्यांना दिले आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार अशोक पाटील यांची ईशान्य मुंबई विधानसभा मतदारसंघासाठी विभाग प्रमुखपदी तर ईशान्य मुंबई महिला विधानसभा संघटक राजश्री राजन मांदविलकर यांची नियुक्ती केली आहे.