Thursday, April 24, 2025
Homeकोकणरत्नागिरीरत्नागिरीत अवघ्या १५ दिवसामध्ये ५८ हजार ४५७ घरगुती वीज जोडण्या

रत्नागिरीत अवघ्या १५ दिवसामध्ये ५८ हजार ४५७ घरगुती वीज जोडण्या

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात महावितरणची विशेष कामगिरी, ४४ हजार ६६९ ग्राहकांच्या नावातील बदलाचे अर्ज निकाली

रत्नागिरी (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात महावितरणने विशेष कामगिरी बजावली. केवळ १५ दिवसांत ५८ हजार ४५७ घरगुती ग्राहकांना नवीन वीजजोडण्या दिल्या तसेच प्रलंबित ४४ हजार ६६९ ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्याचे सर्व अर्ज निकाली काढले. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात १ हजार ५३८ आणि सिंधुदुर्ग -३६१ नवीन ग्राहक तर रत्नागिरी १ हजार १६० व सिंधुदुर्गमधील ३३२ ग्राहकांच्या नावात बदल करून शासनाच्या या उपक्रमाचे महावितरणने १०० टक्के उद्दिष्ट्य साध्य केले.

पंधरवड्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात ग्राहकांच्या प्रलंबित असलेल्या विशेषत: नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करणे या प्रकारच्या तक्रारींचे निवारण करण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले होते. महावितरणने नवीन वीजजोडणीसोबतच ग्राहकांच्या वीजबिलावरीलनावात बदल करण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नवीन ग्राहकांना वीजजोडणीसाठी रहिवाशी असल्याच्या एखाद्या दाखल्यासोबत सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागते तसेच वीजबिलावरील नावात बदल करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. क्षेत्रीय स्तरावर १० सप्टेंबरपर्यंत पैशाचा भरणा करून प्रलंबित असलेल्या राज्यातील ५८ हजार ४५७ नवीन घरगुती वीजजोडणीच्या अर्जावर त्वरित कार्यवाही करून सेवा पंधरवाड्यात सर्व ग्राहकांना नवीन वीजजोडण्या देऊन १०० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.

नवीन वीज जोडण्यांचा विभागनिहाय आढावा

घरगुती ग्राहकांना वीजजोडण्या दिलेल्या अर्जाची प्रादेशिकनिहाय संख्या अशी, औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ९ हजार ५२८, कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत २५ हजार ६८५ ग्राहक असून त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात १ हजार ५३८ आणि सिंधुदुर्ग -३६१ ग्राहक आहेत. नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत १४ हजार ९७५ आणि पुणे प्रादेशिक कार्यालयांतर्गत ९ हजार ६७३ नवीन घरगुती वीजजोडण्या दिल्या आहेत. याशिवाय नावात बदल करण्यासाठी ४४ हजार ६६९ ग्राहकांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. सर्व ग्राहकांच्या नावात बदल करण्यात आले. ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्यात आलेल्या अर्जाची प्रादेशिकनिहाय संख्या अशी, औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ३ हजार २८५, कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत २० हजार २८३ असून यात रत्नागिरी जिल्ह्यात १ हजार १६०, सिंधुदुर्गमध्ये ३३२ ग्राहक आहेत, नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत ६ हजार ३०० आणि पुणे प्रादेशिक कार्यालयांतर्गत १४ हजार ८०१ ग्राहकांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -