मुंबई (वार्ताहर) : पश्चिम रेल्वेचा चर्नी रोड स्थानकाच्या फलाट क्रमांक २ आणि ३च्या उत्तरेला असलेला जुना फूट ओव्हर ब्रीज नव्याने बांधलेल्या ब्रीजला जोडण्यात येणार आहे. या कामाकरिता चर्नी रोड स्थानकाचा फूट ओव्हर ब्रीज पुढील ४५ दिवसांसाठी बंद राहणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, चर्नी रोड स्थानकाच्या फलाट क्रमांक २ आणि ३ च्या उत्तरेकडील बाजूला असलेला जुना फूट ओव्हर ब्रीज, सध्याच्या फूट ओव्हर ब्रीजचे दोन्ही स्पॅन तोडण्यासाठी आणि नव्याने बांधलेला फूट ओव्हरब्रिज आणि प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ यांना जोडणारा लिंक-वे बांधण्यासाठी ५ ऑक्टोबरपासून ४५ दिवसांसाठी हा पादचारी पूल बंद राहणार आहे.