Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरपालघरमध्ये सरपंचपदाचे १६ तर १३४ सदस्यांचे अर्ज अवैद्य

पालघरमध्ये सरपंचपदाचे १६ तर १३४ सदस्यांचे अर्ज अवैद्य

पालघर (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १९८२ प्राप्त उमेदवारी अर्जांपैकी १९६६ वैध ठरले असून १६ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत; तर ३४९० सदस्यांसाठी प्राप्त ९३३५ अर्जांपैकी ९२०१ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून १३४ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी दाखल अर्जांची छाननी झाली असून यात जात पडताळणीचा दाखला, अर्जावर सह्या नसणे अशा विविध कारणांमुळे अर्ज अवैध ठरवले आहेत. दरम्यान ३० सप्टेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचबरोबर चिन्हांचेही वाटप केले जाणार आहे. यानंतरच निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार राहिले हे समोर येणार आहे.

सरपंच पदासाठी अर्ज

तालुका- अर्ज- अवैध

डहाणू – ३८० -२ अवैध
पालघर – ४२९ -०
तलासरी -६२ – -०
वसई – ६५ – १
वाडा – ३१२ -११
विक्रमगड – ३०९ -२
जव्हार – २५७ -०
मोखाडा – १६८ – ०

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -