Tuesday, April 29, 2025
Homeताज्या घडामोडीTadgola : उन्हाळा सुरु होताच ताडगोळ्यांच्या मागणीत वाढ!

Tadgola : उन्हाळा सुरु होताच ताडगोळ्यांच्या मागणीत वाढ!

आदिवासी शेतकऱ्यांना मिळतो ताडगोळे विक्रीतून रोजगार

कासा : डहाणू तालुक्याच्या बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी ताडगोळे दाखल झालेत. यामध्ये मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला ताडगोळ्यांची (Tadgola) विक्री सुरू होत असून महालक्ष्मी मंदिर परिसरात ताडगोळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या ठिकाणी गुजरात, मुंबईकडील येणारे भाविक व ग्राहकांचा ताडगोळे खरेदी करण्याकडे कल अधिक असल्याचे निदर्शनास येत असून याच्या विक्रीतून आदिवासी बांधवांना चांगला रोजगार मिळत आहे.

Central Railway : तीन दिवस मध्य रेल्वेचा विशेष पॉवर ब्लॉक!

ताडगोळे ह्या फळाला विशेष महत्त्व असून उन्हाळी फळ (Summe Fruit) असलेल्या ताडगोळ्याला ‘आईस ऍपल’ संबोधले जाते. पांढरेशुभ्र फळ, रसदार गर आणि चवीला गोड असलेले ताडगोळे ग्राहकांना आवडतात. डहाणू, तलासरी तालुक्यांमध्ये ताडगोळ्यांची विक्री केली जात असून सध्या बाजारात ८० ते १२० रुपये डझन भावाने ताडगोळ्यांची विक्री सुरू आहे. ताडाच्या झाडावर उन्हाळ्याच्या हंगामात येणारी ही फळे चवीला गोड असून समुद्र किनारपट्टी भागामध्ये याचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते. डहाणू तालुक्यात ताडाची (माड) झाडे मुबलक प्रमाणात आहेत.

डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी मंदिर परिसरात सध्या ८० ते १२० रुपये डझनप्रमाणे फळांची विक्री सुरू असून इतर ठिकाणी फळे १६० ते २०० रुपये डझन प्रमाणे विकली जात असल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली. सध्या महालक्ष्मी मंदिर परिसरात १० ते १२ दुकानदार ताडगोळे विक्री करत असून महालक्ष्मी जत्रेत २५ ते ३० दुकानदार ताडगोळे विक्रीसाठी दाखल होतात. ताडगोळे विक्रीतून डहाणू आणि तलासरी तालुक्यातील आदिवासी बांधवांना चांगला रोजगार उपलब्ध होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -