मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात लम्पी स्कीन आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढला असून राज्यातील जवळपास २२ जिल्ह्यांमध्ये जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत. अनेक जिल्ह्यात जनावरांचे बाजार भरवणे बंद करण्यात आले आहेत.
मुंबईत प्राणी प्रदर्शन, बाजार, जनावरांची ने आण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. लम्पी स्कीनमुळे पशुपालक चिंतेत आहेत. दिवसेंदिवस लम्पी स्कीन आजारात वाढ होत असल्याचे दिसत आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी देखील प्राणी प्रदर्शन, बाजार, जनावरांची ने आण करण्यास बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. हे आदेश १३ ऑक्टोबरपर्यंत लागू करण्यात आले आहेत.