Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

पुण्यात शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; एका प्रवाशाचा मृत्यू

पुण्यात शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; एका प्रवाशाचा मृत्यू

पुणे : शिवशाही बस पंढरपूरहून प्रवाशांना घेऊन पुण्याच्या दिशेने जात होती. ही बस पुणे-सासवड रस्त्यावर आली असताना उरळी देवाची फाट्याजवळ असलेल्या गोदामातून निघालेला कंटेनर शिवशाही बसच्या समोर आला आणि जोरदार धडक झाली. अपघातात बस आणि कंटेनरच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. ज्यामुळे एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर चालक, वाहत आणि प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु करण्यात आले.

पुणे-सासवड रस्त्यावर असलेल्या उरळी देवाची गावालगत रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. इथून जवळ असलेल्या गोडाऊनमधून निघालेला कंटेनर सासवडहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या पंढरपूर-पुणे एसटीच्या आडवा आला. या अपघातात चालक, वाहक आणि त्यामधील प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली.

अपघातानंतर इथे वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त शिवशाही बस आणि कंटनेरला हटवण्यात आलं. परंतु या दरम्यान अपघातामुळे उरुळी देवाची फाट्याजवळ वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर अपघातग्रस्त बस हटवल्यानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्ववत करण्यात आली

Comments
Add Comment