मुंबई : वाहतूक कोंडीमध्ये तुर्कीची राजधानी इस्तंबूल आणि कोलांबियाची राजधानी बोगोटानंतर मुंबई जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे एका अहवालात नमूद केले आहे. लंडनमधील ‘गो शॉर्टी’ या कंपनीने ही माहिती दिली आहे. वाहतूक कोंडीच्या यादीत भारतातील बंगळूर व नवी दिल्लीचा पाचवा तर पुण्याचा ११ वा क्रमांक आहे.
मुंबईकरांना दररोज सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पश्चिम द्रुतगती मार्ग सुसाट असला, तरी मेट्रो प्रकल्पाचे काम, त्यामुळे पडलेले खड्डे तसेच बेशिस्त वाहनचालकांमुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीत भर. उपलब्ध रस्त्यांच्या तुलनेत वाहनांच्या संख्येत जास्त वाढ.