Saturday, July 5, 2025

वसतिगृहातील विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल, ८ जणींचा आत्महत्येचा प्रयत्न

वसतिगृहातील विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल, ८ जणींचा आत्महत्येचा प्रयत्न

चंदीगड : पंजाबच्या मोहालीतील एका विद्यापीठात रात्री उशिरा परिस्थिती अनियंत्रित झाली होती. एका विद्यार्थिनीने आंघोळ करताना इतर विद्यार्थिनींचा व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर जोरदार व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर वसतिगृहातील ८ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यातील एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.


पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. विद्यापीठाच्या गेट क्रमांक २ वर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला असून शेकडो विद्यार्थी येथे जमून जोरदार घोषणाबाजी करत आहेत. दरम्यान, पोलिस आल्यानंतर व कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थिनी शांत झाल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनींपैकी एका विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक आहे.


विद्यापीठासमोर रात्री विद्यार्थिनींनी प्रचंड गोंधळ घातलाय. सध्या आरोपी विद्यार्थिनीची ओळख पटली असून वसतिगृहात विद्यापीठ प्रशासनानं इतर विद्यार्थिनींसमोर तिची चौकशी केली. विद्यापीठ प्रशासनाच्या चौकशीत विद्यार्थिनीनं सांगितलं की, ती बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवत होती. ज्या मुलाला ती हे व्हिडिओ पाठवत होती तो शिमलाचा ​​रहिवासी आहे. मात्र, अद्यापपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल किंवा अटक करण्यात आलेली नाहीय. दरम्यान, ६० विद्यार्थिनींचे एमएमएस बनवून इंटरनेटवर अपलोड करण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा