Sunday, April 27, 2025
Homeमहत्वाची बातमीराज्यात पावसाचा जोर वाढणार

राज्यात पावसाचा जोर वाढणार

मुंबईसह पालघर, ठाणे, नाशिकलाही मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या दोन दिवसांत मुंबईसह पालघर, ठाणे आणि नाशिक परिसराला पावसाने शब्दश: झोडपून काढले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात बहुतांशी ठिकाणी पाऊस कोसळल्याने गणेश भक्तांची पुरती तारांबळ उडाली.

गेल्या दोन दिवसांत मुंबईसह पालघर, ठाणे आणि नाशिक परिसराला पावसानं शब्दश: झोडपून काढलं आहे. यानंतर आता १२ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाचे वरिष्ठ शास्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे.

याव्यतिरिक्त पुढील काही तासांत मुंबईसह, पालघर, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि सांगली या जिल्ह्यांत पुढील काही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, असा इशारा होसाळीकर यांनी दिला आहे.पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहणार आहे,असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -