नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा वेगवान गोलंदाज राहुल शर्मा याने क्रिकेटला अलविदा केला आहे. रविवारी त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले आहे.
राहुल शर्माने आयपीएल क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. आयपीएलसोबतच त्याने भारतीय क्रिकेट संघाचेदेखील प्रतिनिधित्व केले आहे. त्याने चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तसेच दोन टी-२० सामन्यात भारतीय संघासाठी गोलंदाजी केली.
राहुल शर्माने आयपीएल क्रिकेटमध्ये २०१० साली पदार्पण केले. या हंगामात त्याने डेक्कन चार्जर्स संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर २०११ च्या हंगामात तो पुणे वॉरिअर्स संघाकडून खेळला. या हंगामात त्याने एकूण १६ विकेट्स घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर त्याला भारतीय संघातही स्थान देण्यात आले. २०१४ सालच्या आयपीएल हंगामात तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळला. त्यानंतर २०१५ साली त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने खरेदी केले होते.