Tuesday, July 23, 2024
Homeदेशकेरळमध्ये केवळ ५० टक्केच हत्ती शिल्लक

केरळमध्ये केवळ ५० टक्केच हत्ती शिल्लक

केरळ : केरळमध्ये केवळ ५० टक्केच हत्ती शिल्लक आहेत. ४४८ हत्तीच शिल्लक राहिले असून गेल्या ५ वर्षांत ११५ बंदी हत्तींचा मृत्यू झाला आहे.

केरळमधील हत्तींच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. २००८ मध्ये केरळमध्ये जवळपास ९०० हत्ती होते. पण आता त्यांचा आकडा तब्बल ५० टक्क्यांनी घटला आहे. केरळमध्ये दरवर्षी सरासरी २५ बंदिस्त हत्तींचा मृत्यू होतो. असे केरळ वन विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे.

१४ जुलै रोजी मंगलमकुन्नु केशवन नामक हत्तीचा मृत्यू झाला. एलिफंट टास्क फोर्सच्या रिपोर्टनुसार, या हत्तीला फिटनेस प्रमाणपत्राशिवाय परेडमध्ये सहभागी करवून घेण्यात आले होते. हेरिटेज अॅनिमल टास्क फोर्सचे सचिव व्ही. के. व्यंकटचलम यांनी ताब्यातील हत्तींविरोधातील क्रौर्यात सातत्याने वाढ होत असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान केरळ एलिफंट ओनर्स फेडरेशनने उत्सवावेळी परेडसाठी बाहेरून हत्ती मागवण्यासाठी नियमांत सूट देण्याची मागणी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -