मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत रोज ८ ते १३ हजार दरम्यान चाचण्या केल्या जातात. यामुळे ८०० ते १२०० दरम्यान रोज रुग्णसंख्या नोंद होत आहे. शनिवारी ६२५ रुग्णांची तर ३ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ५१७७ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत ८३७ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ४२ हजार ७०८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख १७ हजार ८४७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५१७७ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही.
मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ११९ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा तर ऑगस्ट महिन्यात ७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.