Thursday, April 24, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखजय जवान जय किसान; जय विज्ञान, जय अनुसंधान!

जय जवान जय किसान; जय विज्ञान, जय अनुसंधान!

देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन देशाच्या कानाकोपऱ्यांत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी देशाच्या कानाकोपऱ्यांत शहरी, ग्रामीण भाग, विकसित तसेच अविकसित भाग, डोंगराळ भाग ते पहाडी परिसराचा विचार करता देशाच्या नकाशामध्ये असलेल्या काश्मीरच्या टोकापासून तळाशी असलेल्या कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र तिरंगाच झळकलेला पाहावयास मिळत होता. अमृत महोत्सवानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे सकाळी साडेसात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत लालकिल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी प्रथमच पहिल्यांदा स्वदेशी तोफांची सलामी देण्यात आली. आजवर देशाच्या प्रत्येक पंतप्रधानांनी लालकिल्ल्यावरून देशवासीयांशी भाषणातून सुसंवाद साधलेला आहे. पंतप्रधान मोदींच्या भाषणाची देशवासीयांना कमालीची उत्सुकता असते. मोदी यांच्या ‘मन की बात’ची लोकप्रियता त्यातूनच निर्माण झालेली आहे. देशाच्या सद्य:स्थितीवर मोदी सातत्याने प्रकाशझोत टाकताना देशाच्या विकासाबाबतच्या संभाव्य संकल्पना नेहमीच स्पष्ट करत असतात. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी मोदी भाषण करताना देशवासीयांना भावी वाटचालीबाबत माहिती सांगणार हे निश्चित असल्याने युवकांपासून ज्येष्ठ नागरिक हे सर्वच घटक सर्वांनाच मोदींच्या भाषणाची वाट पाहत होते. तथापि पंतप्रधान मोदीं यांचे भाषण काही वेगळेच होते.

देशातील भ्रष्टाचार, राजकारणातील घराणेशाही यांसह देशाच्या विकासाबाबतची वाटचाल, देशाचा आजवरचा विकास आणि भविष्यातील वाटचाल याचा आढावा पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून घेतला. आपल्या भाषणादरम्यान मोदी यांनी देशातील ५जी सर्विसच्या सुरुवातीसंबंधी एक मोठी घोषणा केली. लवकरच ५जी सर्विसची उत्सुकता संपणार आहे. ५जी, सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग आणि ग्रामीण क्षेत्रात ऑप्टिकल फायबर केबलने आम्ही डिजिटल इंडियाची मोहीम जमिनी स्तरावर आणत आहोत. मेड इन इंडिया टेक्नोलॉजी सोल्यूशनचा मोदी यांनी विशेष उल्लेख करत डिजिटल इंडिया प्रत्येक क्षेत्रात मोठा बदल करणार असल्याचे सांगताना मोदी यांनी यापुढे देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावणार असल्याचे सूतोवाच केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेमीकंडक्टरचे प्रोडक्शन, ५जी नेटवर्क्स आणि ऑप्टिकल फाइबर शिक्षण आणि आरोग्य सोबत सर्वसामान्य व्यक्तीचे आयुष्य बदलणार असल्याचे सांगताना मोबाइलने डिजिटल पेमेंट आणि सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग सोबत आम्ही त्या बदलाला पाहत आहोत. ज्याला होण्यास एक युग लागते. आपल्या जवळपास डिजिटल बदल होत आहेत. यात पॉलिटिक्स सोबत इकोनॉमी आणि सोसायटीची नवीन परिभाषा तयार केली आहे. यूजर्संना ५जी सर्विस सुरू होण्याची देशाला खूप उत्सुकता आहे. देशातील दो दिग्गज टेलिकॉम कंपन्या एअरटेल आणि रिलायन्स जिओ या महिन्याच्या अखेरपर्यंत आपली ५जी सर्विस रोलआऊट करू शकते. भारतापुढील सर्वात मोठी दोन आव्हाने भ्रष्टाचार आणि घराणेशाही आहेत. भ्रष्टाचार देशाला पोखरत आहे आणि घराणेशाही राजकारणातूनही संधी हिसकावून घेत असल्याचे मार्मिक भाष्य यांनी यावेळी आपल्या भाषणातून केले. भारत स्वातंत्र्य मिळाल्यावर काय होता, विकासाची वाटचाल टप्याटप्प्याने कशी होत गेली, कशी गती मिळाली, कोठे अडथळे आले आणि कशामुळे अडथळे आले याबाबत बोलताना अमृत महोत्सवी स्वातंत्र्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी पाच संकल्प (पंचप्राण) केले आहेत. विकसित भारत, गुलामगिरीच्या मानसिकतेचा वंश राहणार नाही, वारशाचा अभिमान, देशवासीयांची एकता आणि एकजुटता, नागरिकांच्या कर्तव्याचे पालन असे हे पंचप्राण असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. पुढील २५ वर्षे देशासासाठी महत्त्वाची असतील, असेही त्यांनी नमूद केले. पुढील २५ वर्षांत देश स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करेल. तोपर्यंत हे पाच संकल्प पूर्ण करायला हवेत. २०४७ मध्ये स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होत असताना हे पंचप्राण घेऊन स्वातंत्र्यप्रेमींची स्वप्ने पूर्ण करायची आहेत, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.

मोदींच्या नेतृत्वाखाली जागतिक पातळीवर भारताच्या अस्तित्वाला एक वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. देशाने २०१४ पासून विविध विभागांमध्ये गरुडभरारी मारलेली आहे. अर्थात कोणताही बदल हा एकाएकी होत नाही आणि सहजासहजी सर्वसामान्यांच्या पचनीही पडत नाही. त्यासाठी काही काळ हा जावा लागतो; परंतु मोदींनी २०१४ पासून आजतागायत देशाची धुरा सांभाळताना प्रगतीसोबतच देशवासीयांमध्ये देशभक्तीचा जागर निर्माण करण्याचे व देशाभिमान बिबंविण्याचे काम चोखपणे बजावले आहे. त्यामुळेच आज स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त संपूर्ण देश तिरंगामय झाल्याचे पाहावयास मिळाला. गुलामगिरीच्या छोट्या गोष्टीपासूनदेखील आपल्याला मुक्ती मिळावयाची आहे. देशासमोर दोन मोठी आव्हाने आहेत. एक म्हणजे भ्रष्टाचार आणि दुसरे आव्हान म्हणजे भाऊबंदकी, घराणेशाही. एकीकडे असे लोक आहेत ज्यांना राहायला जागा नाही आणि दुसरीकडे असे लोक आहेत ज्यांना चोरीचा माल ठेवायला जागा नाही. ही स्थिती चांगली नसल्याची खंत पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. जनसामान्यांमध्ये भ्रष्टाचाराविषयी नेहमीच कमालीची चीड असते. भ्रष्टाचार व भ्रष्टाचारी घटक याबाबत सर्वसामान्य घटक चर्चेदरम्यानही आपला संताप व्यक्त करत असतात. हीच नस ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांच्या भावनेला यानिमित्ताने वेगळी वाट करून दिली आहे. गेल्या आठ वर्षांत, थेट लाभ हस्तांतरण करून दोन लाख कोटी रुपयांची बचत केली आहे. हा पैसा चुकीच्या हातात जायचा. पूर्वीच्या सरकारांमध्ये बँका लुटून पळून गेलेल्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जात आहेत. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही एका गंभीर पावले उचलत असल्याचे सांगताना मोदी यांनी नकळत भ्रष्टाचार करू पाहणाऱ्यांना यानिमित्ताने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. आजवरच्या पंतप्रधानांनी केवळ ‘जय जवान जय किसान’ या घोषणा देण्यातच समाधान मानले आहे; परंतु देशाचा विकास हेच ध्येय श्वासामध्ये समर्पित करून नेतृत्व करणाऱ्या मोदींनी मात्र ‘जय जवान जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’ची घोषणा केली आहे. लालबहादूर शास्त्रींनी ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला. यानंतर अटलबिहारी वाजपेयींनी त्यात ‘जय विज्ञान’ जोडले आणि आता त्यात ‘जय अनुसंधान’ जोडण्याची वेळ आली आहे. आता ‘जय जवान जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’, असा नारा पंतप्रधानांनी दिला आहे. देशाला प्रगतिपथावर नेण्याचा संकल्प यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा जाहीर केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -