मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन फोटो अल्बमची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. विद्यापीठाने एक जागतीक विक्रम नोंदवला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे सर्वांचे अभिनंदन केले आहे.
Great news!🇮🇳
Once again, Savitribai Phule Pune University enters the Guinness Book of World Records for – 'Largest Online Photo Album of People Holding a National Flag.'
The final number of photographs was declared as 1,52,559.
Congratulations to team SPPU & every participant! pic.twitter.com/wcPeFPvhjN— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 15, 2022
फडणवीसांनी विद्यापीठाचा फोटो, गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र ट्विट करत याबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटले, चांगली बातमी! पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. राष्ट्रध्वज धारण करणाऱ्या लोकांच्या सर्वात मोठा ऑनलाइन फोटो अल्बमची ही नोंद आहे. छायाचित्रांची एकूण संख्या १ लाख ५२ हजार ५५९ आहे, असे सांगताना त्यांनी पुणे विद्यापीठाची टीम आणि प्रत्येक सहभागींच अभिनंदनही केले.