नवी दिल्ली : काँग्रेसने महागाई, महागाई, जीएसटी, तपास यंत्रणाचा गैरवापर आणि बेरोजगारीविरोधात आज देशव्यापी आंदोलन छेडले आहे. काँग्रेस कार्यकर्ते देशभरात सर्वत्र निदर्शने करत आहेत. राष्ट्रीय राजधानीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींसह सर्वच मोठे नेते रस्त्यावर उतरले आहेत. यासाठी पक्षाने द्विस्तरीय रणनीती तयार केली आहे. वाढता रोष पहाता दिल्लीत जमावबंदी लागू करण्याच आली आहे.
गुरुवारी रात्री उशिरा काँग्रेस मुख्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा जवान तैनात करण्यात आलेत. यामुळे मुख्यालयाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रात्रीपासूनच आपल्या मुख्यालयापुढे डेरा टाकला आहे. या कार्यकर्त्यांची सरकारविरोधात जोरदार नारेबाजी सुरू आहे. राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा व यूपीमधील कार्यकर्ते दिल्लीत पोहोचले आहेत.