नवी दिल्ली : भारतात आता मंकीपॉक्स विषाणू संसर्ग पसरताना दिसत आहे. राजधानी दिल्लीमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा दुसरा रुग्ण आढळला आहे.
राजधानी दिल्लीत राहणाऱ्या ३५ वर्षीय नायजेरियन व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. या व्यक्तीने कोणतीही विदेश यात्रा केलेली नाही. दिल्लीतील मंकीपॉक्सचा हा दुसरा रुग्ण आहे. तर देशातील पाचवा रुग्ण आहे. यातील तीन रुग्ण केरळमधील आहे. तर एका व्यक्तीचा मंकीपॉक्समुळे मृत्यू झाला आहे.