Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीनामांतर निर्णयावर शिक्कामोर्तब

नामांतर निर्णयावर शिक्कामोर्तब

औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील आणि उस्मानाबादला धाराशीव नाव देण्याचा निर्णय : एकनाथ शिंदे

मुंबई : औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील आणि उस्मानाबादला धाराशीव नाव देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे मंत्रिमंडळाची बैठक झाली. २९ जून रोजी सरकार अल्पमतात होते. त्यावेळी मंत्रिमंडळाने काही निर्णय घेतले होते. पुढे कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये म्हणून फेर आढावा घेत निर्णय घेतले आहेत.

औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर हे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उस्मानाबादला धाराशीव असे नाव देण्याचा निर्णय झाला आहे. नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. दि. बा. पाटील यांचे भूमिगत जनतेसाठी महत्त्वाचे योगदान आहे. आम्ही त्यांचे नाव विमानतळाला देण्याचा निर्णय घेतला आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

मावळत्या सरकारप्रमाणं जबाबदारी झटकण्याचे निर्णय नाहीत. उगवत्या सूर्याच्या साक्षीने स्थापन झालेल्या सरकारने जबाबदारी घेत हे निर्णय घेतले आहेत. विधिमंडळात या निर्णयांचे कायद्यात रुपातंर करण्यात येईल. त्यानंतर ते केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवले जातील. तिथे पाठपुरावा करुन आम्ही हे मंजूर करुन घेऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एमएमआरडीएला ६० कोटींच्या कर्जउभारणीसाठी मंजुरी

एमएमआरडीए मोठ्या प्रमाणावर प्रकल्प राबवते आहे. शिवडी-न्हावाशेवा हा देखील मोठा प्रकल्प आहे. असे प्रकल्प राबवताना त्यांनी ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यात पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या १२ हजार कोटींसाठी शासन हमी देखील देण्यात आली आहे. जेणेकरून प्रकल्पांना निधी कमी पडणार नाही, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय

• औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करणार
• उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करणार
• नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करणार
• एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता. तसेच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -