मुंबई : राजभवनात शपथविधी सोहळा संपन्न झाला. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आता नव्या सरकारची बहुमत चाचणी येत्या शनिवारी होणार आहे. यावेळी विधानसभा अध्यक्षाची देखील निवड होणार आहे. विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितले आहे. शनिवारी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष सत्र होणार आहे. बहुमत चाचणीवेळी विधानसभा अध्यक्षांची देखील निवड होणार आहे. महाराष्ट्र विधीमंडळाचे विशेष अधिवेशन २ आणि ३ जुलै होणार आहे. अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विधानसभा अध्यक्षपद भाजपकडे राहणार आहे.